कोल्हापूर – भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी रोहित पवार यांना “औरंगजेबाच्या वृत्तीचा” म्हणून संबोधले, तसेच अजित पवारांच्या पोरांची काळजी वाटते असं म्हटलं. पडळकर यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली आणि रोहित पवारांच्या वर्तमनातील राजकारणी भूमिका चव्हाट्यावर आणली.
पडळकर म्हणाले, “रोहित पवार हा त्याच्या आजोबांप्रमाणेच खोटेपणा करणारा आहे. त्याचे आजोबांनी पन्नास वर्षांपासून सोनं म्हणून पितळ विकलं, आणि आता पवार कुटुंबाने चिंध्या विकण्याचा धंदा केला आहे.” तसेच, “रोहित पवार आणि औरंगजेबाचे साम्य आहे. त्याचा वागत असलेला मार्ग आणि त्याची वृत्तीही तशीच आहे,” असं ते म्हणाले.
पडळकरांनी रोहित पवारांच्या निवडणुकीबाबतदेखील टीका केली. “रोहित पवार पोस्टल मतावर निवडून आले आहेत. ते निवडणुकीत तो जिंकून येईल असं मला वाटत नाही,” अशी शंका व्यक्त करत त्यांनी त्यांचे विरोधात पूर्ण क्षमतेने काम करण्याची धमकी दिली आहे.
पडळकरांनी अजित पवारांनाही टाकलेलं कठोर टीकास्त्र काढले आणि “अजित पवार यांनी कालच म्हटलं की रोहित पवार पोस्टल मतावर निवडून आले आहेत. त्याची अब्रू तेच काढतात” असं म्हणत त्यांच्या पोरांची काळजी व्यक्त केली.
जयंत पाटलांवरही बोचरी टीका
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांनाही सोडले नाही. त्यांनी पाटलांवर आरोप करत “जयंत पाटलांनी राजकारणात लाचारी स्वीकारली आहे. सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका झुकत नाही हे त्यांनी सांगितलं, पण त्यांनी स्वत: झुकण्याची भूमिका घेतली आहे” अशी बोचरी टीका केली.
पडळकर म्हणाले, “जयंत पाटलांच्या बोलण्यात सरकारच्या बाजूने बोलण्याची मानसिकता आहे. खरे लढे लोकांसाठी असावे आणि सरकारच्या विरोधात बोला,” असं ते म्हणाले.
या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील राजकारण आणखी वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेनंतर राजकारणातील चर्चेला अजून वेग मिळाल्याचं दिसून येत आहे.