मुंबई महापालिका निवडणुकीला वेग; अंतिम प्रभाग रचना जाहीर, आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

बातमी इतरांना पाठवा

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मध्यरात्री मुंबई महानगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

अंतिम प्रभाग रचना जाहीर

पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान हरकती व सूचना सादर केल्या होत्या. या हरकतींवर १० ते १२ सप्टेंबरदरम्यान मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्रात सुनावणी घेण्यात आली.

या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे. यामुळे आता निवडणूक प्रक्रियेत पुढील टप्पे — म्हणजेच आरक्षण सोडत आणि मतदार यादी अद्ययावत करण्याची कामे सुरू होणार आहेत.

निवडणुका कधी होणार?

अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे निवडणुकीची वेळ जवळ आल्याचे संकेत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबई महापालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीसाठी जुलै २०२६ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यामुळे आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.