नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर युवकांचा रोष उसळला आणि प्रचंड हिंसक आंदोलन पेटले. संसद भवन, न्यायालय आणि मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल झाल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला. आता सत्तांतराची प्रक्रिया वेगाने सुरू असून, नेपाळच्या जनतेने 35 वर्षीय काठमांडू महापौर बालेन शाह यांना पुढचा पंतप्रधान म्हणून स्वीकारल्याची घोषणा केली आहे.
कोण आहेत बालेन शाह?
बालेन शाह यांचा जन्म 27 एप्रिल 1990 रोजी काठमांडू येथे झाला. वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी. त्यांनी BE सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतून M.Tech (Structural Engineering) पदवी घेतली.
रॅपरपासून राजकारणीपर्यंत प्रवास
2012 मध्ये ‘Sadak Balak’ या गाण्यामुळे बालेन शाह रॅपर म्हणून चर्चेत आले. 2013 मध्ये Raw Barz Rap Battle जिंकल्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढली. रॅपच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि समाजातील समस्या यांवर थेट प्रहार केला.
काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर
2022 मध्ये त्यांनी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवारी दिली आणि नेपाळी काँग्रेस व CPN (UML) सारख्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. ते काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर ठरले.
Gen Z चा आवडता नेता
आजच्या आंदोलनात युवक वर्गाचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याने बालेन शाह हे Gen Z चे आवडते नेता ठरले आहेत. TIME Magazine ने 2023 मध्ये त्यांना ‘TIME 100 Next’ यादीत स्थान दिले होते.
लोकप्रियता आणि संपत्ती
महापौर म्हणून त्यांचे मासिक वेतन सुमारे 46,000 नेपाळी रुपये आहे. अभियंता व्यवसाय, स्वतःची कंपनी आणि संगीत परफॉर्मन्समधून त्यांची अतिरिक्त कमाई होते. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 5-6 कोटी नेपाळी रुपये असल्याचे सांगितले जाते.
नेपाळच्या राजकारणात नवा चेहरा
बालेन शाह हे नेपाळमध्ये स्वच्छ, पारदर्शक आणि नव्या विचारसरणीचे नेतृत्व देऊ शकणारे नेता म्हणून ओळखले जातात. सध्याच्या राजकीय अस्थिरतेत ते Gen Z आणि तरुण पिढीचे आशास्थान बनले आहेत.